मेट्रो-३ च्या खोदकामाचा भाग कोसळून एक कामगार ठार


वेब टीम : पवई
भूमिगत मेट्रो ३ चे काम सुरू असताना खोदकामाचा भाग कोसळून झालेल्या अपघातात एक कामगार ठार झाला तर अन्य एक कामगार जखमी आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

पवई येथे भूमिगत मेट्रो ३ चे काम सुरू होते. बोगद्याच्या बाजूला जो सुरक्षित भाग असतो.

जिथे आपत्कालीन परिस्थितीत मेट्रो मध्ये बिघाड झाला तर पादचारी उतरून चालू शकतात.

त्या ठिकाणी मनुष्यबळ वापरून खोदकाम सुरू असताना अचानक काही भाग कोसळला. या घटनेत एक कामगार ठार झाला.

मेट्रो कॉर्पोरेशनचे संचालक एस.के.गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कामगार खडक फोडत होता तेव्हा तो खडक त्याच्यावर कोसळला.त्या कामगाराच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post