फडणवीसच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : अमित शहा


वेब टीम : मुंबई
गोरेगावमधील नेस्को संकुलात जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयावर अमित शाह यांचं व्याख्यान सुरु झाले आहे.

यावेळी व्याख्यानाच्या सुरुवातीलाच भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील, असे स्पष्ट संकेत देत जाहीर घोषणा केली.

शहा यांनी भाषणाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील राजकीय वाटचालीबाबत स्पष्ट संकेत दिले.

 ”महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आणि विधानभा निवडणूक झाल्याने पुन्हा एकदा राज्याचे होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,” असा उल्लेख अमित शहा यांनी केला.

त्यामुळे राज्यात युती होवो अगर न होवे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याचा हाती राहतील, हे आता स्पष्ट झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post