ना. विजय औटी यांची 'ती' क्लिप जनतेसमोर ठेवणार : निलेश लंके


वेब टीम : अहमदनगर
विधानसभा उपसभापती यांच्या विरोधात पारनेर मतदारसंघातुन विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या निलेश लंके यांनी भाळवणी येथे आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात विजय औटी यांच्यावर गंभीर आरोप केला.

औटी हे विकास कामाच्या नावाखाली ठेकेदाराकडून बळजबरीने कमिशन घेत असल्याचा आरोप केला असून, वेळप्रसंगी त्याची व्हिडिओ क्लिप देखील जनतेसमोर ठेवणार असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी औटी यांचा खरपूस समाचार घेतला.

निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारनेर मतदारसंघातील उमेदवारीचे दावेदार आहेत. विजय औटी हे कमिशन मागत असल्याची व्हिडिओ क्लिप वेळ आल्यावर जनतेसमोर ठेवणार अशी प्रतिक्रियाही निलेश लंके यांनी दिली आहे.

निलेश लंके यांना उमेदवारी देण्याचे संकेत देखील राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी दिले आहेत. अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत पारनेर मतदारसंघातून उमेदवारीचे संकेत देताच निलेश लंके यांनी विजय औटी विरोधात जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

लंके म्हणाले तालुक्यात कै. बाबासाहेब ठुबे यांच्या नंतर कुठला ही तलाव अथवा धरण कुणाला ही करता आलं नसून पाणी प्रश्नावर विधान सभेत किती आवाज उठवला असा सवाल ही त्यांनी ना. औटी यांच्या समोर उपस्थित केला आहे.

ज्यांच्या रक्तात शिवसेना आहे ते माझ्या बरोबर असून ज्यांना जय भवानी जय शिवाजी म्हणण्याची लाज वाटत होती त्यांनी आम्हाला निष्ठा काय असते ते शिकवू नये, असं म्हणत कारस्थान करून मला सेनेतून काढल त्याचा बदला घेण्याची हीच वेळ आहे अशी साद ही जनतेला घातली आहे.

एक सर्वसामान्य मास्तर च पोरग आमदार होतंय हे तालुक्यातील प्रस्थापीत मंडळींच्या डोळ्यात खुपत असून त्यामुळे सगळे एक झाले आहेत, पण तुम्ही ह्या तुमच्या भावाला, मुलाला, तुमच्या मित्राला फक्त एकदा मदत करा. तुमच्या पाठीशी नव्हे तर तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची धमक ह्या निलेश लंकेमध्ये आहे. अस म्हणत जनतेला भावनिक साद घातली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post