पेट्रोल, डिझेल कार्सवर बंदी नाही : गडकरी


वेब टीम : दिल्ली
सरकारचा पेट्रोल व डिझेल वाहनांवर बंदी घालण्याचा कोणताही विचार नसल्याचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी स्पष्ट केले.

वाहन निर्मिती क्षेत्राच्या रोजगार निर्मितीमध्ये तसेच निर्यातीमध्ये असलेल्या योगदानाची सरकारला कल्पना असून असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही याची शाश्वती त्यांनी एका कार्यकर्मात दिली.

सध्या वाहन निर्मिती क्षेत्र संकटात असून वाहनांच्या विक्रीचे प्रमाण गेले वर्षभर सातत्याने घसरत आहे. बऱ्याच कंपन्यांचे कारखाने काही प्रमाणात बंद पडत असून कर्मचारी कपातीचे प्रमाणही वाढत आहे.

पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी विजेवरील वाहनांना चालना देण्याचे सरकारचं धोरण आहे. त्यामुळे विशेषत: डिझेल वाहनांच्या उत्पादनावर बंदी घालण्याची भीती या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना वाटत होती, मात्र ही भीती निराधार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. वाहन उद्योगांची संस्था असलेल्या सिएमच्या ५९ व्या वर्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post