पाकव्याप्त काश्मीर आमचा पुढील अजेंडा: जितेंद्र सिंग


वेब टीम : दिल्ली
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मंगळवारी केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील १०० दिवसांमधील महत्त्वाच्या निर्णयांबद्दल माहिती दिली.

यामध्ये जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द करणे हा महत्त्वाचा निर्णय आहे. तसेच पाकव्याप्त काश्मीर पुन्हा ताब्यात घेणे हा आमचा पुढील अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले.

“ही फक्त माझी किंवा माझ्या पक्षाची वचनबद्धता नाही. तर १९९४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने सर्वानुमते मंजूर केलेला सर्वानुमते ठराव होता,” असेही ते म्हणाले.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यावर भाष्य करताना त्यांनी इतर देशांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन अनुकूल असल्याचे ते म्हणाले.

“काही देश भारताच्या निर्णयाशी सहमत नव्हते, परंतु आता ते सहमत आहेत. काश्मीरमध्येही सामान्य जनतेला मिळणाऱ्या लाभांमुळे सर्वच जण आनंदीत आहेत,” असे ही जितेंद्र सिंग यांनी नमूद केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post