परशुराम सेवा संघाचे विश्वजित देशपांडे नगर दौऱ्यावर


वेब टीम : अहमदनगर
आज ऐतिहासिक अहमदनगर शहरामध्ये, अहमदनगर जिल्हाध्यक्षा सौ. शिल्पा सराफ यांच्या निवासस्थानी परशुराम सेवा संघ, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. विश्वजीत देशपांडे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली.

 त्यावेळी २ नोव्हेंबर २०१९ रोजी होणाऱ्या प्रदेश कार्यकारिणी बैठक संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. त्यावेळी श्री विश्वजीत देशपांडे साहेब यांचा सत्कार पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्री. विष्णुपंत भालेराव यांच्या शुभहस्ते झाला.

तर पुणे जिल्हाध्यक्ष मा. श्री. ऋषिकेशजी सुमंत यांचा सत्कार अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष श्री संतोष भंडारी व श्री. ओंकार जोशी यांचा सत्कार महाराष्ट्र संघटक श्री. आबासाहेब एडके यांनी केला.

त्यानंतर रेणुका मल्टिस्टेटचे प्रवर्तक श्री. प्रशांत भालेराव साहेब यांची भेट घेतली. त्यांचा सत्कार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. विश्वजीत देशपांडे साहेब यांनी केला व २ नोव्हेंबर २०१९ रोजी होणाऱ्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीचे आमंत्रण दिले.

त्यावेळी जिल्हा संघटक श्री. धनंजय गटणे, महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ. प्रिया जानवे, अहमदनगर जिल्हाध्यक्षा सौ. शिल्पा सराफ आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख श्री. कमलेश शेवाळे देवा यांनी सर्वाचे आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post