डिपॉझिट भरायला घेऊन गेला चिल्लर; अधिकाऱ्याने केला पाच हजाराचा दंड


वेब टीम : अहमदनगर
नेवासा विधानसभा निवडणुकीदरम्यान सोमवारी दुपारी अपक्ष उमेदवारी दाखल करण्यासाठी आलेल्या
तालुक्यातील देडगाव येथील मच्छिंद्र देवराव मुंगसे या अपक्ष उमेदवाराला प्लॅस्टिक पिशवीत अनामत रक्कम आणल्याने पाच हजाराचा दंड भरावा लागला.


मुंगसे यांनी अनामत भरण्यासाठी दहा हजाराची चिल्लर आणली होती त्यामध्ये पाचशे रुपयाचे वीस बंडल प्लास्टिक पॅकेट मध्ये आणले होते.

प्लॅस्टिक बंदी असतांना सदरची रक्कम ही प्लॅस्टिक मध्ये आणल्याचे निदर्शनास आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे व नगरपंचायतचे मुख्याधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी समीर शेख यांनी मुंगसे यांना पाच हजाराचा दंड केला.

यावेळी दंड भरताना एक हजाराची चिल्लरसह पाच हजार रुपये भरून दंडाची पावती व उमेदवारी अर्ज भरताना एक हजाराच्या चिल्लरसह दहा हजाराची अनामत रक्कम मुंगशे यांना भरयचा होता. पंरतु ते उमेदवारी अर्ज न भरतच निघुन गेले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post