विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा; भारताच्या खात्यात कांस्यपदक


वेब टीम : नूर सुल्तान
विश्व अजिंक्यपद कुस्तीे स्पर्धेत राहुल आवारेनेही भारताच्या खात्यात कास्यपदकाची भर घातली आहे.

६१ किलोगटात त्याने हे यश मिळवले. कास्यपदकाच्या लढतीत त्याने पॅन अमेरिकन स्पर्धा विजेता अमेरिकेचा टायलर ली ग्राफ याला ११-४ अशी मात दिली.

मात्र हा गट आॅलिम्पिक सामन्यांमध्ये नसल्याने कास्यपदक जिंकूनही राहुल आवारेला टोकियो आॅलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार नाही.

यंदाच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचे हे पाचवे पदक ठरले. त्यात दीपक पुनियाचे रौप्य आणि बजरंग पुनिया, विनेश फोगाट, रवीकुमार दहिया, राहुल आवारे यांच्या कास्यपदकाचा समावेश आहे.

भारताची विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी २०१३ च्या स्पर्धेत आपण तीन पदके जिंकली होती.

पहिल्या काही सेकंदातच ग्राफने दोन गूण घेतले होते. मात्र दुसºया सत्रापर्यंत राहुलने लढतीवर ४-२ अशी आघाडी मिळवली होती.

लढतीचा शेवटचा मिनिट बाकी असताना आवारेकडे नऊ गुणांची भक्कम आघाडी होती.

त्याआधी उपांत्य फेरीत राहुल जॉर्जियाच्या बेका लोमताद्झे याच्याकडून ६-१० असा पराभूत झाला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post