कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता


वेब टीम : पुणे
देशाचा मध्य भाग आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यात पावसाने हजेरी लावली आहे.

पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा मुक्काम कायम राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला.

सध्या उत्तर छत्तीसगड आणि लगतच्या पूर्व मध्य प्रदेशात कमी दबाचे क्षेत्र सक्रिय आहे. तर मान्सूनची ट्रफ रेषा मध्य प्रदेश, छत्तीसगडला ओलांडून बंगालच्या खाडीपर्यंत विस्तारली आहे.

त्यामुळे पश्चिम मध्य प्रदेश, दक्षिण झारखंड, उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचे संकेत आहते. देशाच्या मध्य भागातील उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावणार आहे. दक्षिण गुजरात ते केरळ पर्यंत मान्सूनची सक्रिय ट्रफ विस्तारल्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या किनारपट्टीवरील काही जिल्हयांत मुसळधार पाऊस पडणार आहे.

मुंबई आणि कर्नाटक, उत्तर केरळ किनारपट्टीवर मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर तेलंगणा आणि उत्तर आंध्र प्रदेश, अत्यधिक उत्तर कर्नाटक आणि दक्षिण केरळमध्ये मध्यम पाऊस पडणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post