कोणाची ताकद किती हे मुख्यमंत्र्यांना चांगले माहीत आहे : राठोड


वेब टीम : अहमदनगर
शहरात कोणाची किती ताकद आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  माहिती आहे.

युती झाल्यानंतर माजी खासदार दिलीप गांधी सोबत आले तर ठिक अन्यथा त्यांच्याशिवाय असे सांगत शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी तिकिटावरून शिवसेनेत कधीच मारहाण, धमकी देण्याचे प्रकार घडत नसल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादीलाही चिमटा काढला.

दिल्लीगेट येथे शिवसेनेने आदेश बांदेकर यांचा ' माऊली संवाद ' हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या संवाद कार्यक्रमाविषय माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते .

यावेळी शहरप्रमख दिलीप सातपुते, नगरसेवक दत्ता कावरे , शाम नळकांडे , योगीराज गाडे , अमोल येवले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

उपनेते राठोड म्हणाले, शिवसेनेत लोकशाही असून प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार असल्याचे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post