वेब टीम : अहमदनगर शहराचा विकास आणि तरुणांच्या हाताला काम हाच अजेंडा समोर ठेवुन आपण काम करत आहोत. नगर शहरातील प्रत्येक नागरिकाने शहराबद...
शहराचा विकास आणि तरुणांच्या हाताला काम हाच अजेंडा समोर ठेवुन आपण काम करत आहोत. नगर शहरातील प्रत्येक नागरिकाने शहराबद्दल प्रेमाची भावना दाखविणे गरजेचे आहे. राजकीय स्वार्थासाठी नगर शहराला बदनाम करणा-यांच्या पाठीमागे जावू नका, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन आ.संग्राम जगताप यांनी नगरकरांना केले.
प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक संपत बारस्कर, डॉ.सागर बोरुडे, नगरसेविका दिपाली बारस्कर, मिनाताई चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे मजुर झालेल्या सुमारे ५ कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचा शुभारंभ भिस्तबाग चौक येथे आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते. ' कार्यक्रमास महापौर बाबासाहेब वाकळे, मोहन मानधना, नगरसेवक गणेश भोसले, संपत बारस्कर, डॉ.सागर : बोरुडे, विनीत पाऊलबुद्धे, मनोज दुल्लम, सुनिल त्रिंबके, दिपाली बारस्कर, मिना चव्हाण, शितल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, बाळासाहेब बारस्कर, निखिल वारे, शिवाजी चव्हाण, उदय कराळे, सतिष शिंदे, बाळासाहेब पवार, सतिष ढवण, स्वप्निल ढवण, अजिंक्य बोरकर, हभप तुळशीराम लबडे महाराज, बाबासाहेब गाडळकर, मायाताई कोल्हे आदींसह नागरिक उपस्थित होते.
आ.जगताप पुढे म्हणाले की, केवळ निवडणुका आल्या की, कामांचे नारळ फोडायचे असे उद्योग आपण कधीच केले नाहीत. सर्वांना बरोबर घेऊन शहराचा विकास साधायचा आहे. प्रभाग १ मधील चारही नगरसेवक नागरिकांच्या प्रश्नांसाठी जागरुक आहेत त्यामुळेच या भागात सुमारे ५ कोटी रुपयांची कामे होत आहेत. विकास कामांद्वारे शहर बदलत आहे. नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे उपनगरांच्या विकासालाही चालना मिळत आहे असेही ते म्हणाले. _ महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, गेल्या २५ वर्षांपासून रखडलेल्या विकासाला चालना देण्याचे काम सुरु आहे. विकासासाठी आम्ही सर्वजण पक्ष विरहीत एकत्र येत आहोत. त्यामुळेच शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु झाली आहेत. शहरासह उपनगरांच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही ते म्हणाले. नगरसेवक गणेश भोसले म्हणाले, शहरात यापुर्वी कायम देशाचे राजकारण होत होते. मात्र संग्राम जगताप यांच्यामुळे आता विकासाचे राजकारण सुरु झाले आहे. विकासाचा रखडलेला बॅकलॉक भरुन निघत आहे.
नगरसेवक संपत बारस्कर म्हणाले की, भिस्तबाग महाल ते गजराज फॅक्टरी ते प्रोफेसर चौक या रस्त्याच्या कामासह प्रभागातील अनेक कामे या निधीतून होणार आहेत. तसेच सावेडीतील कचरा डेपो हटविण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे स्थायी समितीत १०० टन कचरा प्रकल्प इतरत्र चालू करण्याचा ठराव झालेला आहे. कचरा डेपोच्या जागेवर स्मशानभुमीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेविका दिपाली बारस्कर यांनी आ. संग्राम जगताप यांच्यामुळे प्रभागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे सांगितले. नगरसेविका मीना चव्हाण यांनी आ.जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून प्रभागाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु असून त्यानुसार कामे केली जाणार असल्याचे सांगितले. शेवटी नगरसेवक डॉ.सागर बोरुडे यांनी आभार मानले.