येत्या पाच वर्षात विकासकामातून शहराला महानगराचा लुक देणार – आ. संग्राम जगताप


वेब टीम : अहमदनगर
गेल्या सात वर्षात नगर शहरात महापौर व आमदारकीच्या माध्यमातून मुलभूत प्रश्‍नाबरोबर विकासकामे मार्गी लावली आहेत. पुढील 5 वर्षात नगर शहर हे सर्वांगीण विकासातून पुणे, मुंबई, नाशिक शहराप्रमाणे आपण करणार आहे.

 तसेच नगर शहराची खेड ही ओळख पुसून महानगर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विकास कामाबरोबर आजच्या तरुण पिढीच्या हाताला काम मिळाले पाहिजे या दृष्टीकोनातून आय. टी. पार्कच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन दिला आहे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

प्रभाग 14 मधील भगवानबाबा नगर येथे रस्ता कॉंक्रीटीकरण कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक झुंबरराव आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, महादेव कराळे, समीर बडे, तात्या दरेकर, रामदास कानडे, छबुराव कांडेकर, बाबासाहेब गाडळकर, सतिश ढाकणे, दादा पांडुळे, पंकज मेहेर, दिनेश जोशी, अमोल आंधळे, प्रशांत कसबे, गणेश आनंदकर, अमोल नांगरे, भैरुनाथ सानप, म्हस्के सर, कसबे, ढाकणे आदी नागरिक उपस्थित होते.

आ. जगताप पुढे म्हणाले की, नगर शहरात प्रत्येक समाजाला एकत्र येण्यासाठी व आपले धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी सारसनगर परिसरात जागा उपलब्ध करुन दिली. याठिकाणी प्रत्येक समाजाने समाजमंदिर बांधले आहे. या माध्यमातून धार्मिक भावना वाढीस लागते. विकासकामाबरोबर धार्मिकतेला तितकेच महत्त्व आहे, असेही आ. संग्राम जगताप म्हणाले.

यावेळी नगरसेवक गणेश भोसले म्हणाले, गेल्या 10 वर्षांमध्ये सारसनगर, बुरुडगाव रोड, भोसले आखाडा, विनायकनगर, माणिक नगर परिसराचा विकासकामातून कायापालट झाला आहे. या सर्व विकासकामाचे श्रेय आ. जगताप यांना जाते. गेली 25 वर्षे याभागात फक्त जंगलासारखी परिस्थिती होती आज ती पुर्णपणे बदलली आहे. सर्वांनी विकासकामे करण्याच्या पाठीमागे उभे रहावे असे आवाहन भोसले यांनी केले.

छबुराव आव्हाड म्हणाले की, सारसनगरचा कायापालट आ. संग्राम जगताप यांनी केला आहे. विकासकामाबरोबर धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व्हावे यासाठी नेहमीच सहकार्य केले आहे. आम्ही सर्वजण आ. संग्राम जगताप यांच्या पाठीमागे उभे आहेत.

यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. या भागातील विकास कामांची माहिती दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post