देशात सेकंडहॅण्ड मोटारींना मागणी वाढली


वेब टीम : दिल्ली
जुन्या मोटारी (सेकंडहॅण्ड कार) खरेदीचा कल दिवसेंदिवस वाढत असल्याचे एका ताज्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

सेकंडहॅण्ड कार विक्री क्षेत्रातील ओएलएक्स पोर्टलने केलेल्या ओएलएक्स ऑटो नोट-३ या तिसऱ्या सर्वेक्षणानुसार भारतीय लोक जुन्या कार खरेदीत आघाडीवर आहेत..

नव्या कारच्या तुलनेत सेकंडहॅण्ड कारची बाजारपेठ १.३ पट मोठी आहे. तसेच साल २०२३ पर्यंत ही बाजारपेठ २५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. ही वाढ खूपच आहे.

ओएलएक्स ऑटो नोट-३ नुसार सेकंडहॅण्ड कार बाजारपेठेची उलाढाल सध्या १ अब्ज डॉलर आहे आणि २०२३ पर्यंत ती २ अब्ज डॉलर्स होणार आहे.

येत्या काही वर्षांत नवीन कार बाजारापेक्षा सेकंडहॅण्ड कार बाजारात १.४ पट जास्त वाढ होईल, सेकंडहॅण्ड कार बाजार साल २०२० पर्यंत ५ दशलक्ष नग आणि साल २०२३ पर्यंत ६ दशलक्ष नगांपर्यंत विस्तारेल.

अहवालातील अध्ययनानुसार, हजारो लोक त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांद्वारे प्रभावित होऊन सेकंडहॅण्ड कारकडे वळत आहेत, तसेच ऑनलाइन माध्यमातून विविध कारच्या उपलब्धतेमुळे त्यांना कारची निवड सोपी वाटते. असे २६ टक्के लोकांचे म्हणणे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post