मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन दोन शिक्षकांनी मारली उडी


वेब टीम : मुंबई
मंत्रालयाच्या दुसय्रा मजल्यावरुन दोन शिक्षकांनी उडी मारल्याची घटना आज घडली आहे. अपंग शाळांमधील शिक्षकांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

चाळीसगावचे हेमंत पाटील आणि उस्मानाबादचे अरुण निठुरे यांनी मंत्रालयाच्या दुसय्रा मजल्यावरुन उडी मारली. या शिक्षकांनी अनुदानाच्या मागणी केली आहे. अपंग शाळांचे अनुदान मिळावे यासाठी मागील अनेक दिवस हे शिक्षक मुंबईत आंदोलन करत आहेत.

मात्र सरकार दखल घेत नसल्याने शिक्षकांनी हे पाऊल उचलले आहे. मंत्रालयाला संरत्रक जाळी लावण्यात आली असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.यानंतर उडी मारलेल्या शिक्षकांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान राज्यात अपंगाच्या विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित 300 शाळा आहेत. त्यांना अनुदान मिळवण्यासाठी मंत्र्यांना भेटायला दोघेजण आले होते. सरकारने चर्चा करूनही जीआर काढला. पण, फक्त तीन शाळांना अनुदान मिळाले.

 त्यामुळे सरकारच्या कारभारावर रोष म्हणून दोघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.दोघांनी मंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण, भेट झाली नाही. त्यामुळे दोघा शिक्षकांनी मंत्रालयातून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post