वेब टीम : अहमदनगर तारकपूर येथील शाळेलगत असलेल्या क्रीडांगणावरच ‘आयुष’चे हॉस्पिटल उभारण्याच्या निर्णयाविरोधात विद्याथी व पालकांनी सुरू ...
वेब टीम : अहमदनगर
तारकपूर येथील शाळेलगत असलेल्या क्रीडांगणावरच ‘आयुष’चे हॉस्पिटल उभारण्याच्या निर्णयाविरोधात विद्याथी व पालकांनी सुरू केलेल्या ‘डब्बा बंद’ आंदोलनाची दखल घेऊन खा.सुजय विखे, माजीी आमदार अनिल राठोड, अँड अभय आगरकर यांनी मध्यस्थी करत तोडगा काढला आहे.
हॉस्पिटल उभारणीच्या प्लॅनची दिशा बदल्याचा निर्णय जाहीर करत, हॉस्पिटल उभारताना क्रीडांगणाला बाधा येणार नाही, शाळेसाठी क्रीडांगण उपलब्ध राहील, असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सेंट विवेकानंद हायस्कूलच्या शेजारीच असलेल्या क्रीडांगणावर आयुषचे हॉस्पिटल प्रस्तावित करण्यात आले आहे.
इतरत्र मोठी जागा उपलब्ध असून प्लॅनची दिशा बदलावी, या मागणीसाठी विवेकानंद स्कूलचे सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी सकाळपासून मैदानावर ठिय्या देत ‘डब्बा बंद’ आंदोलन सुरु केलेे. खासदार विखे यांनी भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या व आंदोलनस्थळी येवून शाळा व्यवस्थापन, पालकांशी संवाद साधला.