विषारी बिया खाल्ल्याने १४ विद्यार्थ्यांना विषबाधा


वेब टीम : अहमदनगर
पाथर्डी तालुक्यातील रुपल्याचा तांडा येथील विद्यार्थ्यांनी विलायताच्या बिया खाल्यामुळे चकरा येऊ लागल्याने चौदा विद्यार्थ्यांना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांवर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

तालुक्यातील आल्हणवाडी केंद्रा अंतर्गत येणाऱ्या रुपल्याचा तांडा येथील जिल्हा परिषदेत प्राथमिक शाळेत शिकणारे हे विद्यार्थी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सुट्टीच्या मध्यांतरामध्ये मैदनावर खेळतांना बाजूलाच जमिनीवर पडलेल्या ह्या विलायताच्या बिया खाल्याने विद्यार्थ्यांना चकरा येऊन जमिनीवर पडले.

काहींना उलट्याचा त्रास होवु लागला. शिक्षक, पालक व ग्रामस्थांच्या समजताच सर्व विद्यार्थ्यांना पाथर्डीची उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले

विद्यार्थ्यांमध्ये मिनाक्षी जाधव, श्रवानिका राठोड, गौरी राठोड, विद्या राठोड, कार्तिक जाधव, प्रणाली राठोड, मनु राठोड, देविका वाघमारे, रोशनी वाघमारे, राणी वाघमारे, सोहन राठोड, आकाश धनगर, विकास धनगर, प्रांजली राठोड अशी आहेत.

वैद्यकिय अधिकारी विनोद गर्जे व मंगेश राऊत यांनी विद्यार्थ्यावर उपचार केले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थीर आहे. उपचार करुन उद्या विद्यार्थ्यांना घरी सोडुन देण्यात येणार असल्याचे डॉ. गर्जे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post