सतरा लघुग्रहांवर पाणी


वेब टीम : न्यूयॉर्क
आपल्या ग्रहमालिकेत लघुग्रहांच्या एका पट्ट्याचेही अस्तित्व आहे. या लघुग्रहांबाबत सातत्याने नवे संशोधन होत असते.

जपानी संशोधकांनीही अशा 17 लघुग्रहांचा अभ्यास करून त्यावरील पाण्याचे संकेत शोधले आहेत.

या खगोलशास्त्रज्ञांनी ‘इन्फ्रारेड सॅटेलाईट ‘अकारी’ कडून मिळालेल्या आकडेवारीचे विश्लेषण केले. यामध्ये त्यांना या लघुग्रहांवर पाणी असल्याचे संकेत मिळाले.

आपल्या ग्रहमालिकेतील पाण्याची स्थिती, लघुग्रहांचा विकास तसेच पृथ्वीवरील पाण्याचे स्रोत याबाबतची नवी माहिती यामुळे पुढे येऊ शकते.

जपानची अंतराळ संशोधन संस्था आणि टोकियो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या या महत्त्वपूर्ण संशोधनामध्ये या लघुग्रहांवर ‘हायड्रेट मिनरल’ च्या रूपात पाणी असल्याचे आढळून आले आहे.

पृथ्वीवरही पाण्याचे अस्तित्व निर्माण होण्यासाठी लघुग्रह किंवा धूमकेतूंचे योगदान असावे, असे अनेक संशोधकांना वाटते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post