#HowdyModi : मुस्लिम कट्टरपंथीयांसोबत एकत्रिपणे लढा देऊ : ट्रम्प


वेब टीम : ह्युस्टन
अमेरिकेतील ‘टेक्सास इंडिया फोरम’च्यावतीने  आयोजीत ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ह्यूस्टनमधील एनआरजी स्टेडियमवर हजारो नागिराकांनी  अभूतपूर्व स्वागत केले.

मोदींनी देखील सर्वप्रथम उपस्थित सर्व नागिरकांना हात जोडून अभिवादन केले. यानंतर त्यांनी अमेरिकन सिनेटर्सची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘की ऑफ ह्यूस्टन’ देऊन सन्मानित करण्यात आले.

ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान मोदी खूप चांगले काम करत आहेत. त्यांनी या ऐतिहासीक कार्यक्रमास उपस्थिती लावल्याने मी अत्यंत आनंदी आहे.

यावेळी ट्रम्प यांनी मोदींना लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल शुभेच्छाही दिल्या. ट्रम्प म्हणाले की, मी मोदींबरोबर आहे, हे मी माझे नशीब समजतो. भारत-अमेरिका एकमेकांचा सन्मान करतात.

भारत आणि अमेरिकेने नोकऱ्या देण्याचे प्रमाण वाढवले आहे. दोन्ही देशांमध्ये जवळपास 33 टक्के बेरोजगारी कमी झाली आहे, असे ते म्हणाले.

भारत आणि अमेरिकेसाठी सीमा सुरक्षा अतिशय महत्वाचा विषय आहे. मुस्लिम कट्टरपंथीयांसोबत एकत्रिपणे लढा देऊ असा इशारा देखील ट्रम्प यांनी दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post