नगरमध्ये राष्ट्रवादीला धक्का; माजी महापौरांनी केला शिवसेनेत प्रवेश


वेब टीम : अहमदनगर
राष्ट्रवादीचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. आमदार संग्राम जगताप यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

यावेळी नगर शहरातून शिवसेनेचे उमेदवार असलेले माजी आमदार अनिल राठोड माजी मंत्री बबनराव पाचपुते शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

कळमकर हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसपासून अलिप्त होते. त्यातच त्यांच्या भगवा झेंडा असलेल्या पोस्ट रविवारी (दि.6) सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. त्यामुळे कळमकर हे सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती.

गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यानंतर कळमकर, जगताप यांच्यात चांगलेच राजकारण पेटले होते. मात्र त्यांच्यामध्ये समेट झाल्याचे दोन्ही गटाकडून सांगण्यात येत होते.

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आ. दादा कळमकर हे खा. शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यांचे पुतणे अभिषेक हे शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याने आता दादाभाऊ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post