अजित पवारांकडे आहे 'इतकी' संपत्ती; वाचाल तरच विश्वास बसेल


वेब टीम : पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बारामती विधानसभा निवडणुकीतील उमेदवार अजित पवार आणि त्यांच्या पत्नीची स्थावर आणि जंगम संपत्ती ७४ कोटी ४२ लाख आहे.

पवार यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या नावे अजित यांच्यापेक्षा अधिक संपत्ती त्यांनी दिलेल्या विवरण पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील नियमबाह्य कर्जवाटप प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झालेल्या गुन्ह्याचा उल्लेखही आजित पवार यांनी प्रतिज्ञापत्रात आहे.

पवार यांच्या नावे होंडा एकोर्ड, होंडा सीआरव्ही, टोयोटो कॅम्ब्रे या तीन मोटारी आणि दोन ट्रॅक्टर, चार ट्रेलर आहेत. त्यांची किंमत सुमारे ८९ लाख आहे.

पत्नीच्या नावेही इनोवा क्रिस्टा ही मोटार आणि एक ट्रॅक्टर आहे. पवारांकडे १३ लाख ९० हजारांचे, तर पत्नीकडे ६१ लाख ५६ हजारांचे सोने आणि चांदीचे दागिने आहेत.

पवार दाम्पत्याच्या नावे सोनगाव, काटेवाडी, ढेकळवाडी येथे शेतजमीन, तर इंदापूर, लोणीकंद, जळोची, काटेवाडी येथे बिगरशेत जमीन आणि इमारती आहेत. त्यांची एकूण किंमत ५० कोटींहून अधिक आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post