राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार


वेब टीम : मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार यांची निवड केली.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पक्षाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत अजित पवारांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

त्याला राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख यांनी अनुमोदन दिले. या निवडीमुळे अजित पवार विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे नेते असतील.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि छगन भुजबळ आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली. ते म्हणाले, “मोदी आणि शाह यांनी ३७० कलमाचा मुद्दा महाराष्ट्रात प्रचारा दरम्यान रेटला मात्र, आम्ही जनतेचे मुद्दे मांडले.

जनजागरण करुन लोकांना याबाबत सांगण्याचे काम अमोल कोल्हे आणि अमोल मिठकरी यांनी केले.

त्याचबरोबर सर्वात कमी जागा लढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांमुळे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला.पक्षाला नवी ऊर्जा देण्याचे काम शरद पवार यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post