आलियाच्या 'या' पोशाखाची भलतीच चर्चा


वेब टीम : मुंबई
आलिया भट ही बॉलीवूडमधली नवी फॅशनिस्टा आहे. मध्यंतरी ती मुंबईच्या विमानतळावर दिसली.

यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती. आलियाने स्ट्राईपवालं ट्रेंडी डेनिम जॅकेट घातलं होतं. हे जॅकेट चांगलंच भाव खाऊन गेलं.

हे जॅकेट नेहमीच्या डेनिम जॅकेटपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. त्यावर न्यूट्रल रंगाच्या स्ट्राईप्स होत्या. या जॅकेटच्या आत तिने गुलाबी रंगाचा टॉप घातला होता.

इतकंच नाही, तर तिची हाय कट मॉम जीन्सही लक्ष वेधून घेत होती. तिची जीन्सही अशीच पट्टेरी होती.

या पोशाखावर तिने पांढऱ्या स्नीकर्स कॅरी केल्या होत्या. तिची गुलाबी रंगाची बॅगही शोभून दिसत होती.

आलियाने केसही मोकळे सोडले होते. छानसा गॉगल लावला होता. प्रवासाला निघणाऱ्या आलियाने सौम्य मेक अप केला होता.

तिच्या या लूकची चांगलीच चर्चा रंगली होती. सोनम कपूरला बॉलीवूडमधली फॅशनिस्टा म्हटलं जातं; पण आता आलिया भटनेही 'हम किसीसे कम' नसल्याचं सिद्ध केलं आहे.

तिची ही अनोखी फॅशन विमानतळावरच्या सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी ठरली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post