बाळासाहेब थोरातांविरुद्ध शिवसेनेकडून साहेबराव नवले मैदानात


वेब टीम : अहमदनगर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात यांना आव्हान देण्यासाठी युतीने श्रमिक उद्योग समुहाचे प्रमुख साहेबराव नवले यांना मैदानात उतरविण्याचे निश्चित केले आहे.

त्यांना सेनेकडून बुधवारी सायंकाळी उमेदवारीसाठी एबी फॉर्म दिला जाणार आहे. त्यासाठी नवले मुंबईकडे रवाना झाले आहे.

प्रदेशाध्यक्ष आ.थोरात यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून युतीकडून सक्षम उमेदवारासाठी चाचपणी सुरू होती. अनेक नावांवर चर्चा झाली.

अखेरीस साहेबराव नवले आणि विक्रमसिंग खताळ अशी दोन नावे चर्चेत होती. बुधवारी सकाळी सेनेने साहेबराव नवले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते.
नवले यांनी यापूर्वी जनता दलातर्फे मतदारसंघातून थोरातांना आव्हान दिले होते.

आता ते पुन्हा एकदा युतीकडून आव्हान देणार आहेत. थोरातांचे कट्टर विरोधक मंत्री विखे पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून नवले यांचा परिचय आहे. श्रमिक उद्योग समुहाच्या माध्यमातून कृषी, दुग्ध व शिक्षण क्षेत्रात ते कार्यरत आहेत.

दरम्यान, थोरात यांच्याविरोधातील लढत यावेळी युतीने प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील सामना कसा होणार, याविषयी उत्सुकता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post