चंद्रकांत पाटलांना हरविण्यावर कोथरूडकर ठाम; मेळाव्याकडे फिरवली पाठ


वेब टीम : पुणे
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांना कोथरुड मतदार संघामधून उमेदवारी मिळाली आहे.

त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज पुण्यात मेळावा घेवून होणार आहे. पाच वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

परंतु 6 वाजेपर्यंत काही मोजकेच कार्यकर्ते मेळाव्याच्या ठिकाणी पोहचले होते.

विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी या नाराज आहेत. तर काही संघटनांनी पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

कोथरूडकरांनी मेळाव्याकडे पाठ फिरवल्याने कोथरूडकर, पाटलांना हरविण्यावर ठाम असल्याची प्रतिक्रिया  काही उपस्थितांनी यावेळी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post