१६ बंडखोरांवर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई


वेब टीम : हरियाणा
हरयाना काँग्रेसच्या प्रमुख कुमारी शैलजा यांनी १६ बंडखोरांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

हे सर्व बंडखोर तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

त्या सर्वांना पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. तसेच, त्यांचे सदस्यत्वदेखील रद्द केले आहे.

यामध्ये माजी खासदार रणजीत सिंह, माजी मंत्री निर्मल सिंह, हरयाना विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आझाद मोहम्मद आणि माजी मुख्य संसद सचिव राम शर्मा आदींचा समावेश आहे.

पक्ष विरोधात कारवाई आणि बंडखोरी केल्याबद्दल या सर्वांचे निलंबन करण्यात आले असल्याचे शैलजा यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post