नगरमध्ये 'या' राजकीय पक्षाच्या ४० कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल


वेब टीम : अहमदनगर
पक्षाचे पंचे गळ्यात घालत, हम तुम्हारे साथ हैं च्या घोषणा देत शहरात विधानसभेच्या निवडणूकीचा विना परवाना प्रचार करणाऱ्या एमआयएमचे उमेदवार मीर असिफ सुलतान यांच्या सह ४० कार्यकर्ते विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवार(दि.८) रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार तखाती दरवाजा परिसरात घडला. या प्रकरणी पो.शि.सचिन गोरे यांनी तक्रार दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. तर दुसरीकडे प्रशासनाकडून निवडणूक काळात कुणाकडून आचारसंहिता भंग होत तर नाही ना याकडे बारकाईने लक्ष आहे.

त्यातच नगरमध्ये सायंकाळी एमआयएम चे उमेदवार मीर असिफ सुलतान यांनी व त्यांच्या समर्थकांनी निवडणूक प्रचार फेरीची परवानगी न घेता पक्षाचे पंचे गळ्यात घालून आदर्श आचारसंहितेचा भंग केला.

तसेच जमावबंदी आदेशाचा भंग केला, याप्रकरणी मिर आसिफ सुलतान (एम आय एम पक्षाचे उमेदवार), डॉ. परवेज अशरफी,  जावेद कुरेशी, शहा फैजल बुर्हाण, कदीर शेख, वाहिद शेख व इतर ३० ते ४० लोक सर्व रा- अहमदनगर यांच्यावर कोतवालीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर हकीगत अशी की, मंगळवारी रात्री सातच्या सुमारास  कोतवाली पोलीस ठाण्यासमोर आरोपी यांनी निवडणूक प्रचार फेरीची परवानगी न घेता एम आय एम पक्षाचे पंचे गळ्यात घालून पक्षाचे उमेदवार मीर आसिफ सुलतान तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं अश्या घोषणा देऊन फटाके वाजवून विधानसभा निवडणूक २०१९ आदर्श आचार संहिता व जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे जमाव बंदी आदेशाचा भंग केला आहे.

यावरून कलम ३७ (१) (३)/१३५ प्रमाणे फिर्याद पो.शि.सचिन नवनाथ गोरे, (नेम.कोतवाली पोलीस ठाणे) यांनी  दिली आहे. पुढील तपास पो.हवा. शिंदे करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post