हरियाणामध्ये जेजेपीला भाजपानं दिलं उपमुख्यमंत्रीपद; महाराष्ट्रात काय होणार?


वेब टीम : चंदीगड
हरयाणामध्ये भाजप जेजेपीच्या (जननायक जनता पार्टी)मदतीने सत्ता स्थापन करणार आहे.

जेजेपीकडे फक्त दहा जागा असतानाही खिंडित अडकलेल्या भाजपाने त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं आहे.

महाराष्ट्रातही भाजपाची वेगळी स्थिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपा सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देणार का? अशी चर्चा सुरू आहे.

हरियाणात कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

90 सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी 46 सदस्यांची गरज आहे. भाजपाला जेमतेम 40 जागा मिळाल्या असून गेल्यावेळेपेक्षा सात जागा कमी झाल्या आहेत.

त्यामुळे भाजपला सहा आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पक्षाचे 10 आमदार निवडून आले असून भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना सत्तास्थापनेसाठी दुष्यंत चौटाला यांची गरज आहे. हे पाहून भाजपाने जेजेपीला उपमुख्यमंत्री पद दिलं आहे.

महाराष्ट्रामध्ये 105 जागांसह भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला. तर 56 जागांसह शिवसेना दुसर्‍या आणि 54 जागांसह राष्ट्रवादी तिसर्‍या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रामध्ये आता सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला आता वेग आला असून पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत.

महायुतीचं सरकार येणार हे निश्चित मानले जाते मात्र, शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मिळणार का? की शिवसेना कुठल्या वाटाघाटीवर भाजपाला टेकू देणार.

अथवा मुख्यमंत्रीपदासाठी राज्यात सत्तेची नवी समीकरणं आखणार. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post