दिल्लीत चार दहशतवादी; रेड अलर्ट जारी


वेब टीम : दिल्ली
दिल्लीत ३ ते ४ दहशतवादी शिरल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली. ही माहिती मिळताच बुधवार रात्रीपासूनच दिल्लीत रेड ऍलर्ट घोषित केला.

ही माहिती हाती येताच श्रेणी-अ मधील दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने शहरात बऱ्याच ठिकाणी छापे टाकले.

दिल्ली पोलिसांनी या वेळी दोन संशयितांना ताब्यात घेतले.श्रेणी-‘अ’ची माहिती ही विश्वसनीय समजली जाते.

दिल्लीत रेड ऍलर्ट घोषित झाल्यानंतर दिल्ली पोलीस सतर्क झाले.दिल्लीत ठिकठिकाणी वाहनांची कसून चौकशी होत आहे.

हे आत्मघाती दहशतवादी जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेचे असल्याचे समजते.

हे दहशतवादी गेल्याच आठवड्यात दिल्ली शहरात शिरले आहेत. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर बिथरलेल्या दहशतवाद्यांनी दिल्लीत मोठा आत्मघाती हल्ल्याची योजना आखली.

सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीत शिरलेल्या दहशतवाद्यांपैकी कमीत कमी दोन दहशतवादी हे पाकिस्तानी आहेत.

गुप्तचर यंत्रणांना ही माहिती मिळाल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी बुधवारी रात्री दिल्लीतील ९ ठिकाणांवर छापेमारी केली.

सीलमपूर आणि उत्तर-पूर्व दिल्लीतील आणखी दोन ठिकाणांवर देखील ही कारवाई केली. यात जामिया नगर आणि पहाडगंज जवळील मध्य दिल्लीतील २ जागांचा समावेश आहे.

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आल्यानंतर पाकिस्तानी दहशतवादी भारतात दहशतवादी हल्ला करू शकतात, अशी शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे.

‘पाकिस्तानने जर या दहशतवादी गटांना नियंत्रणात ठेवले, तर भारतात होणारा हा संभाव्य हल्ला रोखता येऊ शकतो,’ असेही अमेरिकेने स्पष्ट म्हटले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post