दिल्लीत आजपासून महिलांसाठी मोफत बससेवा


वेब टीम : दिल्ली
दिल्लीतील सार्वजनिक बस वाहतुकीत महिलांना मोफत प्रवासाची योजना ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना लागू करण्याचा विचार सुरू आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सूचित केले.

दिल्लीत पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या दृष्टीने त्यांचे कल्याणकारी योजना लागू करण्याचे प्रयत्न आहेत.

महिलांसाठीची मोफत बस योजना मंगळवारी भाऊबिजेच्या मुहूर्तावर सुरू झाली.

महिलांना मोफत प्रवासाची योजना महिलांच्या सक्षमीकरणास फायद्याची असून त्यातून समाजातील लिंगभेद दूर होण्यास मदत होईल.

केजरीवाल म्हणाले की,भावाकडून बहिणींना ही भाऊबीजेची भेट समजा.एके अ‍ॅपवर केजरीवाल यांनी या योजनेबाबत त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

प्रवासाचा खर्च न झेपल्याने ज्या मुली व महिलांना शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण सोडावे लागले, त्यांना आता शिकता येईल.

त्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी मोफत बस प्रवास करता येणार आहे. ज्या महिला नोकरी निमित्ताने बाहेर पडतात, त्यांनाही लाभ मिळेल,असे केजरीवाल यांनी म्हटले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post