गडाखांना जोरदार धक्का; विठ्ठलराव लंघे भाजपात


वेब टीम : अहमदनगर
अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते विठ्ठलराव लंघे यांनी शनिवारी ना.पंकजा मुंडे त्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यांच्या प्रवाशाने नेवासा तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. घुलेंची मदत मिळाल्याने हवेत गेलेल्या गडाखांना जमिनीवर आणणारा लंघे यांचा हा प्रवेश ठरणार आहे.


पांढरीपूल येथे आयोजित सभेप्रसंगी ग्रामविकासमंत्री ना.पंकजा मुंडे, खासदार सुजय विखे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिका राजळे, अशोक गायकवाड, शिवसेना जिल्हा उपप्रमुख हरिभाऊ शेळके, ज्ञानेश्वर पेचे यांच्या उपस्थितीत लंघे व समर्थकांनी प्रवेश केला.


विठ्ठलराव लंघे यांनी या अगोदर दोन वेळेस विधानसभा लढवली. भाजपचे जिल्हाध्यक्षपद व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असताना त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देखील भूषविले आहे.

नुकतेच घुले व गडाख एकत्र आलेले असतांना लघेही सोबत असल्याने गडाखांना निवडणूक सोपी झाली होती. आता लंघे मुरकुटेच्या सोबत गेल्याने गडाखांना ही धोक्याची घंटा ठरणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post