शमी, जडेजा चमकले; भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय


वेब टीम : विशाखापट्टणम
भारताने पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर २०३ धावांनी दणदणीत विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने ५ तर अष्टपैलु रवींद्र जडेजाने ४ बळी घेत मोलाची कामगिरी बजावली.

कसोटीच्या अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी ९ बळींची आवश्यकता होती.

भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत दोन सत्रांतच विजय आपल्या नावावर केला.

पहिल्या डावात आश्विनने ७ बळी घेत दक्षिण आफ्रिकेला सतावले होते दुसऱ्या डावात जडेजा-शमी समोर आफ्रिकन फलंदाजांनी नांगी टाकली.

पाहुण्या संघाचे तब्बल ४ खेळाडू भोपळा फोडण्यातही अपयशी ठरले. यात पहिल्या डावातील शतकवीर क्विंटन डी कॉकचाही समावेश होता.

रविचंद्रन अश्विनने या सामन्यात ८ बळी मिळवत सर्वात जलद बळी मिळवण्याच्या जागतिक विक्रमाशी बरोबरी साधली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post