पुढील वर्षी ‘इस्रो’ करणार अंतराळात एक नवा प्रयोग


वेब टीम : दिल्ली
चांद्रयान-२ मोहिमेनंतर आता इस्रोने पुन्हा एकदा अंतराळ संशोधनात आपली मोहर उमटवणार आहे. काही महिन्यांपूर्वीच इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी अंतराळात भारत आपले स्पेस स्टेशनची नांदी केली होती.

स्पेस स्टेशन उभारण्यापूर्वी अवकाशयान किंवा उपग्रहांना एकत्रित जोडण्याचे महत्त्वाचे काम इस्रोला पूर्ण करावे लागणार.ही मोहीम अत्यंत गुंतागुंतीची आणि कठीण असल्याचे म्हटले.

“इमारत उभारण्यासाठी ज्या प्रकरणे विटांची रचना करावी लागते, त्याच प्रकारचे हे अभियान आहे. ‘स्पेडेक्स’ म्हणजेच ‘स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट’ असे या मोहिमेचे नाव आहे,”अशी माहिती डॉ. सिवन यांनी दिली.

“सध्या सरकारकडून या मोहिमेसाठी १० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.या मोहिमेसाठी पीएसएलव्ही रॉकेटच्या माध्यमातून दोन उपग्रह अवकाशात सोडणार आहेत.

अवकाशात सोडल्यानंतर या उपग्रहांची गती कमी करून त्यांना एकमेकांशी जोडले जाणार आहे. जर त्यांची गती योग्यरित्या कमी झाली नाही तर ते उपग्रह एकमेकांवर आदळूदेखील शकतात आणि हाच या मोहिमेतील सर्वात अवघड भाग असल्याचे, त्यांनी सांगितले.

“ही मोहिम सुरू करण्याचा अर्थ इस्रोच्या स्पेस स्टेशन मोहिमेची सुरूवात झाली असे होत नाही. गगनयान मोहिमेनंतरच डिसेंबर २०२१ मध्ये स्पेस स्टेशन मोहिम हाती घेणार आहे.

अंतराळात मानवाला पाठवणे आणि डॉकिंगमध्ये यश मिळाल्यानंतरच स्पेस स्टेशन मिशनची सुरूवात करणार असल्याचे” सिवन यांनी स्पष्ट केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post