इस्रोच्या वैज्ञानिकाची हत्या झाल्याने हैदराबादेत खळबळ


वेब टीम : हैदराबाद
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या वैज्ञानिकाची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एस.सुरेश (५६) असे या वैज्ञानिकाचे नाव आहे.

 हैदराबादच्या अमीरपेठ भागातील अन्नपूर्णा अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये एस.सुरेश मंगळवारी मृतावस्थेत आढळले.

अज्ञात आरोपीने त्यांची हत्या केली.सुरेश मूळचे केरळचे असून हैदराबादमध्ये ते एकटेच राहत होते. इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर विभागात ते कार्यरत होते.या संदर्भात एका इंग्रजी दैनिकाने दिले.

सुरेश मंगळवारी कामावर आले नाहीत त्यावेळी सहकाऱ्यांनी त्यांच्या मोबाइल नंबरवर फोन केला. त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर इस्रोमधल्या सहकाऱ्यांनी सुरेश यांची पत्नी इंदिराला फोन करुन याबद्दल माहिती दिली.

त्या चेन्नईमधील बँकेत कार्यरत आहेत. सुरेश यांच्या पत्नी कुटुंबियांसह लगेच हैदराबादमध्ये पोहोचल्या व पोलिसांशी संपर्क साधला.

पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा सुरेश मृतावस्थेत होते.

कुठल्यातरी जड वस्तूने डोक्यावर प्रहार केल्याने सुरेश यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post