किरण काळे 'वंचित'कडून मैदानात ; राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार


वेब टीम : अहमदनगर
राष्ट्रवादीला सोडचठ्ठी देणारे किरण काळे यांना वंचित बहुजन विकास आघाडीने अहमदननगर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

आज जाहीर झालेल्या यादीत त्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान काळे यांची उमेदवारी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासाठी त्रासदायक ठरणारी आहे.


आज वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने नगर जिल्ह्यातील अनेक उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात नगर शहर विधानसभा मतदारसंघातूूूून किरण काळे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून पारनेरमधून इंजि. डी. आर. शेंडगे, राहुरीमधून विजय तमनर, अकोलेतून दीपक पथवे, श्रीगोंदातून मच्छिंद्र सुपेकर, शिर्डीतून विशाल कोलगे, संगमनेर बापूसाहेब ताजणे यांनाा उमेदवारी देण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post