टेम्पो भरून लसूण असलेला टेम्पोच पळविला


वेब टीम : अहमदनगर
लसुण विकण्यासाठी पुण्याकडे जात असताना टेम्पो चालकास चौघांनी अडवुन लसणाचा माल भरलेला टेम्पो चार भामट्यांनी पळवुन नेल्याची घटना निळंवडे ते वडगाव पाण फाटा रोडवर 10 ऑक्टोबर रोजी घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, शफीक वलीमोहंमद मन्सुरी (वय 29, रा. धररावदा, जि. रायगड, मध्यप्रदेश) हे 6 लाख 49 हजार 600 रूपये किंमतीच्या 203 लसणाच्या गोण्या घेवुन सोएबकला ते पुणे असे जात  होते.

 निळवंडे गावच्या पुढे टेम्पोच्या इंजिनमधील एअर काढत असताना पाठीमागुन स्कार्पिओमधुन आलेल्या चौघांनी त्यांना काय झाले असे विचारले.

 शफीक मन्सुरी व क्लिनर यांना पकडुन रस्त्याच्या कडेला असलेल्या शेततातील झाडाला बांधले व त्यांच्या ताब्यातील लसणाने भरलेला टेम्पो व मोबाईल असा 18 लाख 50 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांनी भादंविक 392,34 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास स. पोलिस निरीक्षक कादरी हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post