पुण्यात बांधकामाचा पाळणा तुटून दोघांचा मृत्यू


वेब टीम : पुणे
पुण्यातील कोथरुडमध्ये एका इमारतीच्या लिफ्टचे काम सुरु असताना पाळणा कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला.

मुशीर बुराह रहमान (वय २४) असे एका मृत कामगाराचे नाव आहे तर दुसऱ्या कामगाराचे नाव अद्याप समजलेले नाही.

ही घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महात्मा सोसायटीच्या पुढील बाजूस असलेल्या २० मजली इमारतीच्या लिफ्टचे काम सुरु होते.

त्यावेळी मुशीर रहमान आणि त्याच्या सोबतचा एक जण हे काम करत होते. त्याचवेळी पाळणा तुटला आणि हे दोघे यामध्ये जखमी झाले.

या दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र या दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

कोथरुडमधील महात्मा सोसायटीच्या शेवटच्या टोकाला डोंगराच्या बाजूला एका २० मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे.

या इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून इमारतीला रंग देण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी इमारतीच्या कडेने पाळणा बांधला होता.

त्यावर उभे राहून दोन कामगार काम करत होते. तेव्हाच या पाळणा कोसळला आणि या दोघांचा मृत्यू झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post