मोदींच्या प्रवासासाठी आता क्षेपणास्त्र सज्ज विमान; 'अशी' आहे घातक क्षमता


वेब टीम : दिल्ली
देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी असलेल्या विमानांमध्ये आता अत्याधुनिक क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा ‘मिसाइल डिफेन्स सिस्टम’ येईल. या विमानांचे उड्डाण एअर इंडियाचे वैमानिक नव्हे, तर हवाई दलाचे वैमानिक करतील.

एअर इंडियाकडून हवाई दलाच्या वैमानिकांना बोईंग ७७७ विमानांच्या उड्डाणाचे प्रशिक्षण सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील दिग्गज नेते जुलै २०२०पासून बोईंग ७७७ या विमानातून प्रवास करतील.

देशाच्या पंतप्रधानांसाठी पहिल्यांदाच अत्याधुनिक क्षेपणास्त्र सज्ज विमाने असतील. अमेरिकी प्लांटमध्ये या विमानांची निर्मिती होत आहे.

अमेरिकी बी ७७७ विमानात लार्ज एअरक्राफ्ट इन्फ्रारेड काऊंटर मेजर्स (एलएआयआरसीएम) आणि सेल्फ प्रोटेक्शन सुइट्स (एसपीएस) असेल. ही विमाने जुलै २०२०मध्ये भारतात येणार आहेत.

या विममानांचे सारथ्य जरी हवाई दलाकडे असले तरी या विमानांची देखभाल करणारे पथक एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (एआयईएसएल) करणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post