आता मनसेही रिंगणात, २७ जणांची यादी जाहीर


वेब टीम : मुंबई
शिवसेना, भाजपनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत मनसेने २७ उमेदवार घोषित केले आहेत. कालच पक्षाच्या मेळाव्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुक लढवणार असल्याची घोषणा केली होती.

पुण्यातील ४ उमेदवारांचा समावेश
मनसेने या यादीत पुण्यातील चार जणांचा समावेश केला आहे. हडपसर मतदारसंघातून नगरसेवक वसंत मोरे यांना उमेदवारी मिळाली आहे. मोरे यांनी अगोदरच प्रचाराला सुुरुवात केली असून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्यावर त्यांनी अनेक गैरव्यवहारांचे आरोप केले आहेत. त्यामुळे आता हडपसर मतदारसंघामध्ये तिरंगी लढत पहायला मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.

कसबा पेठ मतदारसंघातून अजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेचे संघटनात्मक काम गेल्या अनेक वर्षांपासून शिंदे करत आहेत.

कोथरूड मतदारसंघामधून माजी नगरसेवक किशोर शिंदे याच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली असल्यामुळे आता चंद्रकांत पाटील यांना शिंदेंचे आव्हान असणार आहे. अद्याप आघाडीने याठिकारी उमेदवार घोषित केलेला नाही.

शिवाजीनगर मतदारसंघामधून सुहास निम्हण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याठिकाणी भाजपचे सिद्धार्थ शिरोळे यांचे त्यांना आव्हान असेल. काँग्रेसकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.

सिंदखेडातून नरेंद्र पाटील
तसेच मनसेने मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी ब्रम्हा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनाही उमेदवारी जाहीर केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post