आता प्रत्येक मोबाईल होणार 'फास्ट चार्ज'; नवीन बॅटरीचा शोध


वेब टीम : न्यूयॉर्क
सध्या भारतात एकापेक्षा एक सरस असे स्मार्टफोन लॉंच होत आहेत. बहुतेक उत्पादक कंपन्या ‘फास्ट चार्जिंग फिचर्स’ देत आहेत.

मात्र, हे फिचर प्रत्येक मोबाईलमध्ये उपलब्ध असत नाही. यामुळे जास्त पॉवर असलेल्या बॅटरीला चार्ज करण्यात जास्त वेळ लागतो.

आता स्मार्टफोनचे चार्जिंग लवकर संपणे आणि चार्ज करण्यास भपूर वेळ लागणे, या गोष्टी इतिहासजमा होण्याची शक्यता आहे.

शास्त्रज्ञांच्या पथकाने ‘लिथियम आयन बॅटरी’ चे नवे डिझाईन तयार केले आहे. हे डिझाईन विकसित करण्यात अनेक भारतीय शास्त्रज्ञांचाही हात आहे.

‘एसीएम नॅनो मटेरियल’ नामक जर्नलमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार या बॅटरीमध्ये रासायनिक तत्त्व असलेल्या एंटिमनीचा वापर करण्यात आला आहे.

यामुळे या बॅटरीची ‘लिथियम आयन’ संग्रहित करण्याची क्षमता अन्य बॅटरींच्या तुलनेत अधिक आहे. तसेच या बॅटरीत ‘नॅनोचेम’ नामक जाळीदार संरचना असलेल्या इलेक्ट्रॉडचा वापर करण्यात आला आहे. यामुळे ‘लिथियम आयन’ चार्ज होण्याची क्षमता वाढते.

परिणामी, चार्जिंगसाठी लागणारा वेळ कमी होतो. शास्त्रज्ञांच्या मते, नव्या बॅटरीमुळे स्मार्टफोनसह संगणकसुद्धा जास्त दिवस चालू शकतील.

या डिव्हाईसचे लाईफ बॅटरीमध्ये आयन संग्रहित होण्याच्या क्षमतेवर अवलंबून असणार आहे. बॅटरीच्या या नव्या डिझाईनचा वापर भविष्यात मोठ्या बॅटरींमध्येही होऊ शकतो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post