आमदार मोनिका राजळेंना मंत्री करा; माजी आमदारांची मागणी?


वेब टीम : अहमदनगर
पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदार मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झालेल्या आमदार मोनिकाताई राजळे यांना मंत्रिपदाची संधी द्यावी.

अशी मागणी जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या दिग्गज नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. .

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने सर्वाधिक जागा राज्यात जिंकल्याने मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्यासाठी व शेवगाव पाथर्डीच्या आ.मोनिकाताई राजळे दुसऱ्यांदा निवडून आल्याने त्यांचा सत्कार मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यासाठी मुंबई दरबारी जिल्हाध्यक्ष प्रा.भानूदास बेरड यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे काही दिग्गज नेते यावेळी सोबत होते.

भविष्यकाळात मंत्रीपदाचे दावेदार ठरणार होते अशा भाजपच्या उमेदवारांना सहकार्य न करता विरोधकांसाठी कार्यकर्त्यांची रसद पुरवत भाजप उमेदवारांना घरी बसवण्याची पद्धतशीरपणे केलेल्या उद्योगाची जोरदार चर्चा आता जिल्हाभर सुरू झाली असून, या राजकीय घडामोडीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील याबाबत तक्रारीचा पाढा वाचून दाखवला असल्याचे चर्चा सुरू झाली आहे. .

जिल्ह्यातील भाजपचे संभाव्य मंत्रीपदाचे दावेदार ठरणारे माजी मंत्री राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले, स्नेहलताताई कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे यांचा प्रामुख्याने यामध्ये समावेश आहे.

श्रीगोंदा मतदारसंघातून निवडून आलेले बबनराव पाचपुते यांचा देखील निसटता विजय झालेला आहे. त्याचबरोबर शेवगाव पाथर्डीच्या आ.मोनिकाताई राजळे यांना देखील त्यांनी मतदारसंघात केलेले विकासकामाने तारले आहे. त्यांच्या विरोधात देखील भाजप नेत्यांचेच कार्यकर्ते दंड थोपटून होते. .

आ.कर्डिलेंच्या बाबतीतही असाच प्रकार घडल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा झीरो करण्याऐवजी भाजप महायुतीचेच बारा झिरो होते की काय अशीच परिस्थिती निवडणुकीच्या निकाला दरम्यान दिसून आली.

 विरोधी पक्षाच्या उमेदवारांना कार्यकत्यांच्या माध्यमातून रसद पुरवण्याचे काम कोणी केले याबाबतही आता जोरदार चर्चा जिल्हाभर सुरू झाली आहे.

या सर्व बाबींचा पाढाच कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे वाचून दाखवला असल्याची चर्चा आहे. .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post