'हा' उमेदवार ठरला राज्यातील सर्वात गरीब आमदार


वेब टीम : मुंबई
भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवरून राज्यातील वातावरण तापलेले असतानाच सोशल मीडियावर मात्र या आमदाराची चर्चा जोरात सुरू आहे.

डहाणूमधील नवनिर्वाचित आमदार विनोद निकोले हे यंदा निवडून आलेले सर्वांत गरीब आमदार ठरले आहेत.

निकोले पालघरमधील डहाणू मतदारसंघामधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर निवडून आले.

त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. विरोधकांनी पैसे वाटले तरी मला विश्वास होता की, मी जिंकेन, असे मत विजयानंतर निकोले यांनी व्यक्त केले.

सोशल मीडियावर आमदार निकोले यांच्या संपत्तीची जोरदार चर्चा सुरू आहे.

त्यांची  एकूण संपत्ती ५१ हजार ८२ रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे निकोलेंच्या नावावर स्वत:चे घरही नाही.

 ते डहाणूमधील वाकी येथे भाड्याच्या घरामध्ये राहतात. त्यांची पत्नी बबिता या आश्रमशाळेमध्ये सेविका म्हणून काम करतात. त्यांचे महिन्याचे वेतन सहा हजार रुपये आहे.

निकोले यांनी उमेदवारी अर्जाबरोबर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्याकडे ३० हजार २४० रुपयांची रोख रक्कम असल्याचे म्हटले आहे.

पत्नीकडे पाच हजारांची रोख रक्कम असल्याचेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

आपण पूर्णवेळ पक्षाचे कार्यकर्ते असून आपल्याला महिन्याला पाच हजार रुपये वेतन मिळत असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये स्पष्ट केलं आहे.

भाजपचे विद्यमान आमदार धनारे जनरा यांचा ४ हजार ७०७ मतांनी पराभव करून निकोले निवडून आले आहेत.

 निकोले यांच्या विजयामुळे त्यांच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post