देशातील मंदी तात्पुरती; लवकरच बाजारात तेजी येणार : अंबानी


वेब टीम : रियाध
भारतीय अर्थव्यवस्था डळमळली असल्याचे मत अनेक अर्थतज्ञांनी नोंदवले होते. आता भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असा लौकिक असणारे रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनीही देशात आर्थिक मंदी असल्याचे सांगितले आहे.

परंतु, देशातील आर्थिक मंदी ही तात्पुरत्या स्वरूपाची असून सरकारने उचललेल्या पावलांमुळे येत्या काही महिन्यांतच अर्थव्यवस्थेमध्ये पुन्हा तेजी येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सौदी अरेबियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह’ या कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते होते.

या कार्यक्रमात मुकेश अंबानी यांच्यासह भारतातील अनेक दिग्गज व्यावसायिकदेखील सहभागी झाले होते.

‘भारतीय अर्थव्यवस्थेत थोडी मंदी आहे. मात्र ती तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं माझं मत आहे.

अर्थव्यवस्थेला तेजी देण्यासाठी गेल्या काही महिन्यांमध्ये सरकारद्वारे ज्या उपाययोजना करण्यात आल्या त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल. पुढील तिमाहीत ही परिस्थिती बदललेली असेल,’ असं अंबानी यावेळी म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post