इजिप्तमध्ये सापडल्या जमिनीत गाडलेल्या ३ हजार वर्षांपूर्वीच्या शवपेट्या


वेब टीम : कैरो
इजिप्तमधील ममींबाबत सगळ्यांनीच ऐकले-वाचले असेल. या ममी एक प्रकारच्या रहस्यासारख्या असतात.

हल्लीच इजिप्तमध्ये एक अध्ययन करण्यात आले, त्यात ३ हजार वर्षांपेक्षाही जास्त प्राचीन असलेल्या शवपेट्यांमध्ये अजूनही असली रंग आणि छपाई दिसून आली.

लक्सरमधील एका प्राचीन कब्रस्तानात पुरातत्वशास्त्रज्ञांनी हे संशोधन केले. तिथे त्यांना या शवपेट्या दिसून आल्या. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, १९व्या शतकानंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या मानवी शवपेट्यांचा शोध लागला आहे. .

इजिप्तच्या लक्सर शहरात शास्त्रज्ञ नेहमीच ममीचा शोध घेत असतात. त्यांच्यासाठी हे शहर एखाद्या खजिन्याप्रमामेच आहे.

इजिप्तच्या ममींवर जे पुरातत्वशास्त्रज्ञ अध्ययन करतात, त्यांना नेहमीच तिथे काहीतरी नवीन सापडते. आता शास्त्रज्ञांनी जे संशोधन केले आहे, त्याची तुलना १८९१मध्ये अशाच प्रकारच्या पुजाऱ्याच्या ममीच्या संशोधनासोबत केली जात आहे.

या दुमजली कब्रस्तानात आढळून आलेल्या हजारो वर्षांपूर्वीच्या शवपेट्यांमध्ये पुजारी, त्यांच्या पत्नी आणि मुलांच्या ममीचा समावेश आहे. त्यांनी इ. स. पूर्व दहाव्या शतकात २२व्या फाराओ वंशाच्या शासनकाळात दफन करण्यात आले होते.

या ममी सापडल्यानंतर आता पुढचे संशोधन केले जात आहे. १९व्या शतकानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने मानवी शवपेट्या सापडल्या असून या रंगबिरंगी शवपेट्या पाहून शास्त्रज्ञही चकीत झाले आहे. विशेष म्हणजे त्यांचा रंग अजूनही फिका पडलेला नाही. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post