नागवडे म्हणाले आमचंन् पाचपुतेंचं जमणार नाही पण...


वेब टीम : अहमदनगर
श्रीगोंदा मतदारसंघातील राजकारण धक्कादायक वळणावर येऊन ठेपले असून आघाडीचा एक मोहरा खासदार सुजय विखे पाटील यांच्या गळाला लागला आहे.

साकलाई व तालुक्याच्या प्रश्नात लक्ष घालून नागवडे कुटुंबाला भविष्यात आमदार करण्याची जबाबदारी घेण्याची गळ राजेंद्र नागवडे यांनी घातली असून मागण्या मान्य नसतील तर निवडणूक लढवणारचं असल्याचा इशारा दिला. पाचपुतेचं आमचं कधी जमणार नाही.. त्यांच्या स्टेजवर जाणार नाही.. पण...

श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात रोज नवीन घडामोडी घडत आहेत. त्यातच खा.सुजय विखे यांनी श्रीगोंद्यातील कट्टर विरोधक बबनराव पाचपुते व राजेंद्र नागवडे यांच्या मनोमिलनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून विखे यांनी नागवडेंच्या मेळाव्यात हजेरी लावत नागवडे यांना भाजपात येण्याचे थेट आमंत्रण दिले. व त्यात ते यशस्वी झाल्याचे चित्र या मेळाव्याच्या निमित्ताने पाहायला मिळाले.

ढोकराई फाटा येथील प्रगती मंगल कार्यालयात आज नागवडे कार्यकर्त्यनाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अचानक खा.डॉ विखे यांनी एंट्री केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. नागवडे यांनी दोन दिवसात विखेंच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मागण्या मान्य न केल्यास अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय जाहीर केला.

नागवडे म्हणाले की, विखे कुटुंबाने आम्हाला सतत मदत केली.निवडणूक जाहीर होईपर्यंत आघाडीकडे उमेदवारीसाठी प्रयत्न केले परंतु उमेदवारी दिली नाही दहा दिवस आधी अचानक उमेदवारी करण्यास सांगितले.

पाडापाडीचे, गलिच्छ राजकारण नागवडे कुटुंबाने कधी केले नाही. नगरपरिषदेचे प्रश्न, घोड, कुकडी पाणी प्रश्न खा विखेंनी लक्ष घालून मदत करावी लागेल.

साकळाई व तालुक्यातील प्रश्नत लक्ष घालण्याची जबाबदारी विखे आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. नागवडे कुटुंबाला भविष्यात आमदार करण्याची जबाबदारी विखे यांनी घ्यावी. या गोष्टी मान्य करणार असतील तर निर्णय घेऊ.

७ तारखेपर्यंत तुम्ही निर्णय कळवा नाही तर निवडणूक लढवणार, पाचपुतेचे आमचे कधी जमणार नाही, त्यांच्या स्टेजवर जाणार नाही. असे ते म्हणाले.
खा.डॉ.विखे म्हणाले की, राजकारणात नैतिकता राहिली नाही. श्रीगोंद्यात काही लोक निवडणुकीच्या जीवावर आपली दुकानदारी चालवतात. विधानसभा निवडणुकीच्या जीवावर दिवाळीच्या खरेदीची तयारी केली आहे. निवडणूक लागली की मताच्या बाजारावर अनेकजण आपली पोळी भाजतात. मला खासदार करण्यात नागवडे कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचा गौप्यस्फोट विखेंनी केला.

नागवडे कुटुंबाचा स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी वापर करून घेतल्याची टीका थोरतांचे नाव न घेता केली. पण राजू दादा नागवडे तुम्ही आतातपर्यंत चुकीच्या गाडीत बसलात त्याला आम्ही काय करणार. आता माझ्या गाडीत बसलात अडचण येणार नाही राजकारणात दोन्ही डगरीवर हात ठेवला पाहिजे असा सलाही देखील विखेंन्नी दिला.

नागवडेंचा अपक्ष उमेदवारी अर्ज राहिला तर माझी डोकेदुखी वाढेल. त्या निवडून येऊ शकतात पण माझ्यावर भाजपचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आहे. भाजपात माझं कुणी ऐकत नाही, भाजपात शिस्तीने काम चालते, काँग्रेसमध्ये असताना एबी फॉर्म माझ्या गाडीत असायचे सत्तेविरोधात संघर्ष करून काय मिळणार. माझा शब्द प्रमाण आहे तो मी मोडणार नाही. तसले धंदे मी करत नाही मला भविष्यातही खासदार राहायचंय म्हणून मी वेळ मारून नेणार नाही. असेही ते शेवटी म्हणाले.

काँग्रेस राष्ट्रवादीने कुणाला काही दिल नाही. आघाडीचे ५०च्या पुढं जागा निवडून येणार नाहीत ते फक्त बाक वाजवण्यापूरते मर्यादित राहणार. माझ्या वडीलांचा सन्मान करण्याचा मुख्यमंत्र्यांकडून शब्द घेतला त्यानंतर मी भाजपात गेलो. नगर दक्षिणेतील भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मी गॅसवर आहे. तालुक्यात कुणाला वर न्यायचं खाली आणायचं हे मला माहित आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post