पाण्याच्या शोधासाठी चंद्रावर रोव्हर पाठविणार नासा


वेब टीम : वॉशिंग्टन
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा चंद्रावरील आगामी मानवी मोहिमेपूर्वी पृथ्वीच्या या उपग्रहावर रोव्हर पाठवून तेथे पाण्याचा शोध घेणार आहे.

चंद्रावरून नियमित ये-जा करणे, तेथे मानवी वसाहत स्थापन करणे यांसाठी या मोहिमेतून मिळणारी माहिती उपयुक्त ठरणार आहे. .

व्होलाटाइल्स इन्व्हेस्टिगेटिंग पोलर एक्सप्लोरेशन रोव्हर अर्थात व्हायपर असे या रोव्हरचे नामकरण करण्यात आले आहे.

गोल्फ कार्टच्या आकाराचा हा रोव्हर २०२२च्या डिसेंबर महिन्यात चंद्रावर उतरेल. या मोहिमेसाठी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची निवड करण्यात आली.

याच ठिकाणी चांद्रयान दोन उतरविण्याचा भारताने प्रयत्न केला होता. चंद्राच्या या ध्रुवावर थेट सूर्यकिरणे पोहोचत नसल्याने तेथील तापमान अतिशय थंड असते.

या ठिकाणी गोठलेल्या अवस्थेत पाणी असल्याचा दावा आतापर्यंतच्या संशोधनातून करण्यात आला आहे. त्यामुळे या ध्रुवावर रोव्हर उतरवून पाण्याच्या साठ्यांचा शोध घेण्यात येणार आहे.

आगामी मानवी मोहिमेसाठी हा शोध महत्त्वाचा ठरेल. चंद्रावर विपुल प्रमाणात पाण्याचे साठे आढळले, तर अंतराळवीरांसाठी पाणी उपलब्ध होईल.

तसेच अंतराळ मोहिमांच्या रॉकेटसाठीचे इंधन तयार करण्यासाठी या पाण्याचा वापर करता येईल. भविष्यातील मानवी मंगळ मोहिमांसाठी चंद्रावरील प्रस्तावित तळ महत्त्वाचा असणार आहे.

चंद्रावर पाण्याचे साठे सापडले तर हा तळ उभारण्यास मदत होणार आहे, असे 'नासा'चे प्रशासक जिम ब्रिडनस्टाइन म्हणाले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post