नेपाळमधील बस दुर्घटनेत ११ जण ठार


वेब टीम : काठमांडू
सिंधुपालचौक जिल्ह्यात एका बस दुर्घटनेत ११ प्रवाशांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेत बरेच जण जखमी झाले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे.

ही बस हेलबू येथून भोट सियावरून काठमांडू येथे निघाली होती. चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

या घटनेत तीस पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले तर अकरा जणांना आपला जीव गमवावा लागला.

या बसमध्ये एकूण ७० प्रवासी होते. बरेच प्रवासी बसच्या टपावर बसून प्रवास करत होते.

डीसीपी माधव प्रसाद कफले यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत किंवा जखमींच्या संख्येत वाढ नाही, बचावकार्य वेगाने सुरू आहे.

सहा जण जागीच ठार झाले तर पाच जणांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.

नेपाळमध्ये सार्वजनिक वाहनांवर प्रवाशांचा अतिरिक्त भार हे चित्र नेहमीचेच आहे. या वर्षात अतिरिक्त प्रवासी वाहतुकीमुळे अपघात झालेल्या घटना देखील बऱ्याच आहेत.

नेपाळमधील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दहा वर्षांत अशा धोकादायक वाहतुकीमुळे २२ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post