मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना धक्का; 'या' सुविधा होणार बंद


वेब टीम : श्रीनगर
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला हे ५ ऑगस्टपासून नजरकैदेत आहेत. येथील गुपकर रस्त्यावर त्यांचे सरकारी बंगले आहेत.

मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना आता ते सरकारी बंगले सोडावे लागणार आहेत. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० आणि ३५ ए रद्द केल्यानंतर आता नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे त्यांना आता सरकारी बंगले सोडावे लागतील.

कलम ३७० आणि ३५ ए रद्द झाल्यानंतर आता १ नोव्हेंबरपासून जम्मू काश्मीरमध्ये नवे नियम लागू होणार आहेत. पूर्वीच्या नियमांनुसार जम्मू काश्मीरच्या सर्व मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगले हे कायमस्वरूपी वास्तव्यास मिळत होते.

तसेच त्यासाठी कोणत्याही प्रकारचे भाडे ही आकारले जात नव्हते.परंतु आता त्यांना ते बंगले सोडावे लागणार आहेत. मेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा त्यात समावेश आहे.

आझाद हे त्या बंगल्यास वास्तव्यास नाहीत. आझाद यांनी त्यांना देण्यात आलेल्या बंगला रिकामा केला असल्याची माहितीही समोर आली आहे.

गुलाम नबी आझाद यांना सोडून राज्याच्या अन्य मुख्यमंत्र्यांनी सरकारी बंगल्याच्या सौदर्यीकरण आणि आधुनिकीकरणाच्या नावाखाली आजवर कोट्यवधी रूपयांचा खर्च केला आहे. तर ओमर अब्दुल्ला यांच्या बंगल्यात अन्य सुविधांव्यतिरिक्त जिमसारख्या सुविधादेखील केल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post