एबीपी- सी व्हॉटर्सचा सर्व्हे; राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार


वेब टीम : मुंबई
महायुतीला १९२ ते २१६ जागा मिळतील, असा अंदाज एबीपी सी व्होटर्सच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. 

या एक्झिट पोलनुसार महायुतीला १९२ ते २१६ जागा मिळतील, आघाडीला ५५ ते ८१ जागा मिळतील व इतर पक्षांना ४ ते २१ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

महायुती २०० पार जाणार यात काहीही शंका नाही, एक्झिट पोलमध्ये सांगण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी सगळ्याच नेत्यांनी प्रचारासाठी मैदान गाजवलं.

मात्र भाजपा आणि शिवसेना यांचीच सरशी होणार हे एक्झिट पोलचे अंदाज सांगत आहेत. राज्यात सहा वाजेपर्यंत ६०.५ टक्के मतदान झाले आहे.

 मतदान अद्यापही सुरु असल्याने हा टक्का वाढण्याची शक्यताही असे निवडणूक आयोगाने वर्तवली आहे.


विधानसभा निवडणुकीसाठी आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान पार पडले. मतदानाला आज सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली होती.

 २८८ जागांसाठी मतदान झालं. १४५ ही मॅजिक फिगर आहे. मतदान पार पडलं आहे. उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. गुरुवारी निकाल लागू लागतील तसं पुन्हा महाराष्ट्रात काय घडणार, हे चित्र स्पष्ट होणार आहे.

शहरी भागात मतदान करण्याबाबत काहीसा निरुत्साह जाणवला तर ग्रामीण भागातील मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. आता निकालाच्या दिवशी काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.

एबीपी सी व्होटर्स
विभागवार कुणाला किती जागा?

पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील ७० जागांपैकी ४२ जागा महायुतीला जिंकेल. २५ जागा महाआघाडीला तर इतरांना ३ जागांना

विदर्भ
विदर्भातील एकूण ६० जागांपैकी ५० जागांवर महायुती जिंकणार, ९ जागा महाआघाडीला तर इतरांना ३ जागा इतरांना मिळू शकतात

उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील ३६ पैकी २३ जागांवर महायुतीचा विजय, १२ जागा महाआघाडीकडे

मराठवाडा
मराठवाड्यातील ४७ जागांपैकी २६ जागा महायुतीला, १४ जागा महाआघाडीला इतरांना ६ जागा 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post