पंतप्रधान मोदींची परळीत सभा; वैद्यनाथांचेही घेणार दर्शन


वेब टीम : बीड
विधानसभा निवडणुकीच्या महायुतीच्या उमदेवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी गुरुवारी परळीत येणार आहेत.

मोदी हे स्वतः शिवभक्त असल्याने ते वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येतीलच अशी चर्चा नागरिकातून होत होती.

ते सभेआधी वैद्यनाथ मंदिरात विधीवत पूजन करून नंतर सभेला जाणार असल्याचे समजते.

देशातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून परळीच्या वैद्यनाथाचा उल्लेख हिंदू धर्माच्या धार्मिक ग्रंथांमध्ये आढळुन येतो.

नरेंद्र मोदी हे प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणार असल्याने मंदिर परिसरात जय्यत तयारी सुरू झाली असून, याकडे प्रशासन बारकाईने लक्ष देऊन आहे.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजेपयी नंतर परळीत येणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान असणार आहेत.

शहरात होणाऱ्या प्रचारसभेआधी ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शन करणार आहेत.

बुधवारी सायंकाळी 9 पर्यंत पंतप्रधान दर्शन घेणार की नाही हे नक्की नव्हते. परंतु आता त्यांच्या दर्शनाची तयारी मंदिर परिसरात सुरू झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post