'या' माजी उपमुख्यमंत्र्याच्या घरावर आयकर विभागाचा छापा


वेब टीम : बेंगळुरू
कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री जी परमेश्वरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संबंधित बऱ्याच ठिकाणी आयकर विभागाकडून छापे टाकले जात असून यावेळी चार कोटींहून जास्त रोख रक्कम जप्त केली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणीत चार कोटी २५ लाखांची रोख रक्कम ताब्यात घेतली आहे.

जी परमेश्वरा यांच्याशी संबंधित एकूण ३० जागांवर छापेमारी केली.आयकर विभागाकडून शुक्रवारी सकाळी देखील तपासणी सुरु होती.

वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेल्या कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणी ही छापेमारी सुरु असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

काँग्रस नेते परमेश्वरा आणि माजी खासदार आर एल जलप्पा यांच्याशी संबंधित ठिकाणांची तपासणी करण्यासाठी ३०० हून अधिक आयकर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

आयकर विभागाला मेडिकलच्या जागा अपात्र विद्यार्थ्यांना ५० ते ६० लाखांमध्ये विकली जात असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर हे छापे टाकले आहेत.

तपासा दरम्यान आयकर विभागाला मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि वैद्यकीय प्रवेशात गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध करणारी काही कागदपत्रे सापडली.

या छापेमारीसंबंधी बोलताना जी परमेश्वरा यांनी गुरुवारी सांगितले की, “आपल्याला छापेमारीसंबंधी कोणताही कल्पना नाही. त्यांना तपासणी करु देत.

मला काहीच अडचण नाही. पण जर आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्यात सुधारणा करण्यास तयार आहोत”.

जलप्पा यांनी राजकीय द्वेषातून हे छापे टाकल्याचा आरोप केला.परमेश्वरा हे कुमारस्वामी-काँग्रेसच्या युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post